वॉशिंग्टन: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्यामुळे अमेरिकाचीनविरोधात लवकरच कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत याबद्दलचे संकेत दिले. चीनविरोधात अतिशय गंभीरपणे तपास सुरू करण्यात आला असून जर्मनीनं केलेल्या १३० बिलियन युरोपेक्षा जास्त रक्कम आम्ही भरपाई म्हणून मागू, असं ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं.सध्या सुरू असलेल्या घडामोडींकडे जर्मनी प्रमाणेच आमचंही लक्ष आहे. आम्ही जर्मनीपेक्षा जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागण्याचा विचार करत आहोत, असं ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे युरोपियन देशांसह अमेरिकेचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. जगभरात ३० लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातले एकटे १० लाख अमेरिकेत आहेत. कोरोनामुळे दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी जीव गमावला असून त्यातले ५६ हजार मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचं नुकसान टाळता येणं शक्य होतं. मात्र चीननं कोरोनाच्या संसर्गाबद्दल जगाला पारदर्शकपणे माहिती दिली नाही. चीननं सुरुवातीला कोरोनाची माहिती लपवून ठेवली, असं अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीला वाटतं. त्यामुळे अनेक देशांनी चीनकडून नुकसान भरपाई मागण्यास सुरुवात केली आहे. जर्मनीनं चीनकडे १३० बिलियन युरोची भरपाई मागितली आहे.व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना तुम्हीही जर्मनीप्रमाणे चीनकडे नुकसान भरपाई मागणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आम्ही अद्याप अंतिम रक्कम निश्चित केलेली नाही. मात्र ती बऱ्यापैकी पुरेशी असेल, असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं. कोरोनामुळे संपूर्ण जगाचं नुकसान झालं आहे. अमेरिकेलादेखील खूप मोठा फटका बसला आहे. यासाठी चीनला जबाबदार धरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या आम्ही या संदर्भात अतिशय गंभीरपणे तपास करत आहोत, असं ट्रम्प म्हणाले.लॉकडाऊन नेमका कसा हटणार?; मोदी सरकारकडून 'एक्झिट प्लान'वर काम सुरू३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेतमुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना
CoronaVirus: तुम्ही चीनकडे किती भरपाई मागणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचं 'भारी' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 10:02 AM