शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Coronavirus: अमेरिकेला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 2:14 AM

कोविड-१९ विषयी ट्रम्प यांचा सूर जरी काहीसा बदलला असला तरीही त्यांचे प्राथमिक धोरण अर्थव्यवस्थेला अनुसरूनच आहे.

- डॉ. विजय मोरे

व्यक्तिश: ट्रम्प जनमानसाचे आवडते नेते नसले तरीही भांडवलशाहीमध्ये भक्कम अर्थव्यवस्थेचे महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. ह्या आर्थिक प्रगतीकडे पाहता ट्रम्प यांना २०२० मधल्या निवडणुकीत हरवणे केवळ अशक्य वाटत होते. कोविड-१९ ने जगावर आणलेल्या महासंकटाला अमेरिकाच काय, पण कुठलीही अर्थव्यवस्था प्रतिकार करू शकणार नव्हती, हे मात्र नक्की.

कोविड-१९ विषयी ट्रम्प यांचा सूर जरी काहीसा बदलला असला तरीही त्यांचे प्राथमिक धोरण अर्थव्यवस्थेला अनुसरूनच आहे. २४ मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत स्पष्ट केले... ‘‘रोगापेक्षा इलाज जास्त नुकसानकारक नको.’’ आज ह्या सर्व बंद केलेल्या उद्योगांमुळे जर बाजारात मंदी आली तर लोक हजारोंच्या संख्येने आत्महत्या करतील, असं ट्रम्प यांना वाटतं.

अमेरिका देश बंद ठेवणं शक्य नाही आणि लवकरच आपल्याला पुन्हा सर्व सुरू करण्याची इच्छा आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं. ज्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचू नये, म्हणून ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचा धोका मोठा नाही आणि अमेरिका भक्कम आहे असा सूर धरला होता, ती व्यवस्था कोलमडून पडताना दिसते आहे. १५ ते २५ मार्चदरम्यान शेअरबाजाराचा निर्देशांक २५ टक्क्यांनी घसरला आणि २०१६पासून झालेली सर्व प्रगती दिसेनासी झाली.

मार्च महिना सुरू झाल्यापासून तब्बल ३५ लाख लोकांनी बेरोजगारी सहकार्यासाठी सरकारकडे अर्ज दिला. ह्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्याबरोबर ट्रम्प यांची देशवासीयांना आर्थिक मदत करायची तयारी चालू झाली. २४ मार्चला अमेरिकेच्या सिनेटमधून मंजूर आलेल्या कायद्यानुसार सरकारी खजिन्यातून २ लाख कोटी डॉलरचे पॅकेज घोषित केले गेले. या विशाल रकमेतील बहुतांश हिस्सा कोविड-१९च्या साथीने फटका बसलेल्या उद्योगांना मदत म्हणून वापरला जाणार आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे, कि २०१९मध्ये ‘सीडीसी’च्या 'संसर्गजन्य रोग नियमन' विभागात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. आज आपत्कालीन परिस्थिती आल्यावर ट्रम्प लाखो कोटी खर्च करून

अर्थव्यवस्था मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत; पण ट्रम्प यांच्याच धोरणांमुळे पूर्वतयारीचा अभाव ही समस्या निर्माण झाली.अमेरिकेच्या आजच्या नेतृत्वात दूरदृष्टीचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. २०१३मध्ये आलेल्या इबोला संसर्गावर ओबामा यांनी उचललेली पावले आणि कोरोनावर ट्रम्प यांचे निर्णय यांत प्रचंड तफावत आढळून येते आहे. ट्रम्प यांची संपूर्ण विचारसरणी भांडवलशाही पद्धतीची आहे; पण योग्य तिथे उद्योजकांना प्रोत्साहन आणि योग्य वेळी जनमानसाचा विचार याचं साटंलोटं त्यांना नक्कीच जमलेलं दिसत नाही. म्हणून इतका प्रगत आणि विकसित देश असून अमेरिका आज कोरोना संसर्गासमोर हतबल आहे.

भांडवलशाहीचा उगम आणि त्यातून झालेली औद्योगिक क्रांती याने पुरवलेल्या इंधनातून जगाचा तंत्रज्ञान आणि आरोग्यशास्रात विकास झाला. पण मग जनकल्याण आणि अर्थव्यवस्थेचे भले यामध्ये समतोल साधने गरजेचे नाही का? भांडवलशाही आपल्यासाठी की आपण भांडवलशाहीसाठी? एकीकडे ५०० रुग्ण असताना पंतप्रधान मोदींनी भारतभर संचारबंदी लागू केली... आणि इथे अमेरिकेत परिस्थिती भयाण असूनही सर्व पुन्हा सुरू करण्याचा मनसुबा. अमेरिकेची आरोग्यव्यवस्था भक्कम आहे म्हणून विषाची परीक्षा घ्यायची का?

अमेरिकेतील बहुमताला ह्या सर्व प्रश्नांबद्दल काय वाटतं, हे नोव्हेंबर २०२०मध्ये होणाºया निवडणुकीतूनच कळेल... आणि तेही जर कोरोना व्हायरसने निवडणुका वेळेवर घडू दिल्या तर.(लेखक अमेरिकास्थित सिनियर सायंटिस्ट आहेत.)

मार्च महिना सुरू झाल्यापासून तब्बल ३५ लाख लोकांनी बेरोजगारी सहकार्यासाठी सरकारकडे अर्ज दिला. ह्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्याबरोबर ट्रम्प यांची देशवासीयांना आर्थिक मदत करायची तयारी चालू झाली. २४ मार्चला अमेरिकेच्या सिनेटमधून मंजूर आलेल्या कायद्यानुसार सरकारी खजिन्यातून २ लाख कोटी डॉलरचे पॅकेज घोषित केले गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प