वॉशिंग्टन : ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी भारत आणि पाकिस्तानमधून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधींची आयात करताना या औषधीच्या सुमार गुणवत्तेसह कोविड-१९ संबंधी दिलेल्या इशाºयांची दखलच घेतली नाही, असा गंभीर आरोप अमेरिकेचे बडतर्फ शास्त्रज्ञ रिक ब्राईट यांनी केला आहे.
जागल्यांच्या सुरक्षा पाहणाºया अमेरिकेच्या विशेष वकिलांच्या कार्यालयात रिक ब्राईट यांनी दाखल केलेल्या तक्रारीत उपरोक्त आरोप केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनसारख्या औषधी आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणांसंबंधी मी दिलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष केले.
बडतर्फ करण्यात आले तेव्हा रिक ब्राईट हे आरोग्य आणि मानवी सेवा विभागाच्या बायोमेडिकल अॅडव्हान्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेन्ट अॅथॉरिटी या संशोधन संस्थेचे प्रमुख होते. भारत आणि पाकिस्तानमधून आयात करण्यात येणाºया औषधींबाबत ते चिंतित होते. कारण एफडीएने या औषधींची किंवा या औषधींचे उत्पादन करणाºया कारखान्यांची तपासणी केलेली नव्हती. त्यांचे असे म्हणणे होते की, तपासणी न केलेल्या कारखान्यातील औषधीत भेसळ असण्याची किंवा औषधीची मात्रा योग्य प्रमाणात नसण्याची शक्यता आहे. तेव्हा ही औषधी घेणाºयांसाठी धोकादायक ठरू शकते. धोका माहीत असूनही डॉ. कॅडलेक आणि अन्य अधिकाºयांनी या औषधी मोठ्या प्रमाणावर बाजारात आणल्या, असा त्यांचा आरोप आहे.शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित उपायांवरच खर्च करावाकोरोनामुळे ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने वैज्ञानिक गुणवत्तेचा अभाव असलेल्या औषधी, लस आणि अन्य तंत्रावर खर्च न करता सुरक्षित आणि शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित उपायांवरच खर्च करावा, यासाठी आग्रही असल्याने मला बडतर्फ करण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे.