कोरोना व्हायरसची वॅक्सीन २०२० वर्षाच्या अखेरपर्यंत मिळेल असा दावा अनेक कंपन्यांनी गेल्या काळात अनेकदा केला. पण ठोस असं कुणी काही सांगू शकत नाही. अशात अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीचे सीईओ म्हणाले की, जे लोक या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना वॅक्सीन मिळण्याबाबत बोलत आहेत ते जनतेचं फार मोठं नुकसान करत आहेत. Harvard Business Review मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, Merck & Co's चे सीईओ केनेथ फ्रेजियर म्हणाले की, ज्या कोरोना वॅक्सीनचे ट्रायल सुरू आहेत त्यांची काहीच गॅरंटी नाही.
केनेथ फ्रेजिअर म्हणाले की, ज्या वॅक्सीनवर काम सुरू आहे, त्या तयार झाल्यावर कदाचित त्यांची क्वालिटी पुरेशी नसेल. जर तुम्ही अब्जो लोकांना वॅक्सीन देणार आहात तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, वॅक्सीन कशी काम करते.
याआधी एका अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, सरकार यावर्षीच्या शेवटपर्यंत वॅक्सीनचं उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत पार्टनरशिप करत आहे. ट्रम्प सरकार २०२१ च्या शेवटपर्यंत ३० कोटी वॅक्सीनची खुराक तयार करण्यावर विचार करत आहे. याला ऑपरेशन वार्प स्पीड प्रोग्राम नाव देण्यात आलं आहे.
Merck चे सीईओ केनेथ फ्रेजियर म्हणाले की, आधीच्या अनेक वॅक्सीन सुरक्षा तर देऊ शकल्या नाहीच वरून व्हायरसला सेलवर हल्ला करण्यात मदत करत होत्या. असं झालं कारण या वॅक्सीन इम्यून करण्याच्या गुणांनी परिपूर्ण नव्हत्या. त्यामुळे आपल्याला सावध राहण्याची गरज आहे.
Merck कंपनी ने मे महिन्यात ऑस्ट्रिया ची कंपनी Themis Bioscience सोबत संभावित वॅक्सीन कॅंडिडेटवर रिसर्चची योजना आखली होती. पण कंपनी अजून वॅक्सीनची क्लिनिकल ट्रायल सुरू करू शकली नाही. केनेथ फ्रेजियर हे कोरोना महामारीबाबत म्हणाले की, अश्वेत लोकांच्या अधिक मृत्यूदराने वर्णद्वेषाची फार पूर्वीपासून सुरू असलेली समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे.