वॉशिंग्टन: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, संक्रमितांची संख्याही वाढतीच आहे. कोरोनाचा अमेरिकेला मोठा फटका बसला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात ट्रम्प प्रशासनाला अद्याप यश मिळालेलं नाही. कोरोना विषाणूसमोर अमेरिकाही हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कोरोनानं अमेरिकेत सर्वाधिक बळी गेले असून, अमेरिकी वैज्ञानिकांनीसुद्धा कोरोनावर लस निर्माण करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. कोरोनाच्या लसीच्या आम्ही एकदम जवळ आहोत. २०२० वर्ष संपण्यापूर्वीच कोरोना विषाणूवरची लस तयार करू, असा दावासुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये कोरोनावर पत्रकारांना संबोधित केलं. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड आणि चीनमधील लसींच्या चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले असता, 'आम्ही लसीच्या अगदी जवळ आहोत, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. आमच्याकडे लस निर्माण करण्यासाठी कार्यकुशल आणि हुशार वैज्ञानिक आहेत. आम्ही सध्या प्रयोगाच्या अगदी जवळ नाही, कारण जेव्हा प्रयोग केला जातो, त्यास थोडा वेळ लागतो, परंतु आम्ही तो प्रयोग पूर्ण करून लवकरच कोरोनावरची लस तयार करू, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 7:56 AM
कोरोना विषाणूसमोर अमेरिकाही हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, संक्रमितांची संख्याही वाढतीच आहे.कोरोनाचा अमेरिकेला मोठा फटका बसला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात ट्रम्प प्रशासनाला अद्याप यश मिळालेलं नाही.कोरोनानं अमेरिकेत सर्वाधिक बळी गेले असून, अमेरिकी वैज्ञानिकांनीसुद्धा कोरोनावर लस निर्माण करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.