गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. देशात सातत्यानं दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. भारताच्या या कठीण काळात काही देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्सनंदेखीलभारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच फ्रान्स कायमच भारतीयांसोबत असल्याचा संदेशही त्यांनी हिंदीतून लिहिला आहे. "आपण ज्या महासाथीच्या संकटातून जात आहोत त्यापासून कोणीही दूर राहिलेला नाही. भारत सध्या कठीण काळातून जात आहे हे आम्ही जाणतो. फ्रान्स आणि भारत कायमच एकत्र होते. आम्ही मदत पोहोचवण्यासाठी काम करत आहोत," असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांनी म्हटलं आहे. त्यांनी यांसदर्भात हिंदीतून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.