लंडन - इंग्लंड सरकारच्या अधिकृत वैज्ञानिक सल्लागार गटाने (SAGE) आगामी काळात अत्यंत घातक सुपर-म्युटेंट कोरोना व्हायरस व्हेरिएंटच्या धोक्याचा इशारा दिला आहे. या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की हा विषाणू विद्यमान लसींना प्रभावशून्य करेल. त्यांनी इशारा दिला आहे, की व्हायरसला पूर्ण पणे नष्ट करणे कठीण आहे आणि म्हणूनच नव-नवे व्हेरिएंट येत राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, अँटीजेनमध्ये भिन्नतेच्या मदतीने लस कुचकामी ठरतील. यामुळे वेरिएंट्स येत राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, अँटीजेनमध्ये व्हेरिएशनच्या मदतीने लस कुचकामी होऊ शकते.
अनेक व्हेरिएंट आले समोर - अहवालानुसार, ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांच्यापासून संसर्ग पसरू नये, हे लक्ष्य असायला हवे. तसेच, गेल्या काही महिन्यात, असे अनेक व्हेरिएंट समोर आले आहेत, जे लसीपासून वाचले आहेत. पण, पूर्णपणे प्रभावशून्य करू शकले नाही. तथापि, जसजसे लसिकरण पुढे जाईल तसतसे अनेक विषाणू त्यांच्यापासून संरक्षण विकसित करण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच प्रसारण थांबवणे अत्यंत महत्वाचे आहे.
...तर मोठ्या प्रमाणावर वाढेल मृत्यूदर - या अहवालात वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे, की सुपर म्यूटेंट व्हेरिएंटमुळे तीन पैकी एका व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. तज्ञांचे म्हणणे आहे, की यैणारा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या बीटा आणि केंटमध्ये आढळलेल्या आल्फा अथवा भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटने मिळून बनला, तर तो लसीलाही कुचकामी करेल. यामुळे मृत्यूदर वाढण्याचीही शक्यता आहे.
लॉकडाउन संपवण्यापूर्वी इशारा - या अहवालाच्या आधारे तज्ज्ञांनी पुन्हा एकदा इंग्लंडमधील लॉकडाऊन निर्बंध संपविण्याच्या सरकारच्या तयारीसंदर्भात इशारा दिला आहे. SAGE अहवाल दर्शवतो, की अद्याप व्हायरसने पिछा सोडलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात सरकारने अधिक सतर्क असण्याची गरज आहे. तसेच सरकारने हिवाळ्यापर्यंत जनतेला बूस्टर शॉट द्यावा, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.