बीजिंग : कोरोनाग्रस्त गर्भवती महिला प्रसूत झाल्यानंतर तिच्याकडून या विषाणूचा संसर्ग नवजात बालकाला होण्याची शक्यता नसल्याचे असे एका पाहणीत आढळून आले आहे. फ्रंटिअर आॅफ पेडियाट्रिक्स या नियतकालिकाच्या अंकामध्ये या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला आहे.या लेखात म्हटले आहे की, कोरोनाग्रस्त चार मातांची वुहान येथील रुग्णालयात नुकतीच प्रसूती झाली. या महिलांची व त्यांच्या नवजात बालकांच्या प्रकृतीची हुआझोंग विद्यापीठातील संशोधकांनी खूप बारकाईने तपासणी केली. चीनच्या वुहान प्रांतातूनच कोरोना साथीचा उगम झाल्याचे मानण्यात येत आहे. जगभरात कोरोना विषाणूची दीड लाख लोकांना लागण झाली असून, आजवर सहा हजारपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे.कोरोनाग्रस्त चार महिलांच्या नवजात बालकांंपैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यातील एका बालकाला जन्मापासून पुढचे तीन दिवस श्वसनाचा थोडा त्रास झाला होता. पण तो नेहमीच्या औषधांनी बरा झाला. (वृत्तसंस्था)चौघांची प्रकृती उत्तमएका बालकाच्या अंगावर चट्टे आढळून आले. त्याच्या मातेला कोरोनाची लागण झाल्यामुळेच बालकाच्या अंगावर हे चट्टे उमटले आहेत असे खात्रीने आताच काही सांगता येणार नाही, असे फ्रंटिअर आॅफ पेडियाट्रिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा सहलेखक यालान लिऊ या संशोधकाने म्हटले आहे.या चारही नवजात बालकांची प्रकृती उत्तम आहे. याआधीही कोरोनाग्रस्त नऊ महिलांच्या व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला होता.त्यावेळीही कोरोनाग्रस्त महिलेच्या प्रसूतीवेळी तिच्या नवजात बालकाला या विषाणूची लागण झाली नसल्याचे आढळून आले होते.
Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 6:40 AM