अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 26,047 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 613,886 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO) गंभीर आरोप केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी पुरविला जातो. ज्यावेळी प्रवासावर निर्बंध घातले होते, त्यावेळी त्यांनी माझ्यावर टीका आणि त्याबद्दल असहमती दर्शविली होती. बऱ्याच गोष्टींबद्दल ते चुकीचे होते. ते जास्तकरुन चीनला केंद्रित करत असल्याचे दिसून येते. आमच्याकडून जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर नियंत्रण आणत आहोत" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा सहा लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 2,228 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 613,886 झाली असून आतापर्यंत 26 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप
राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर