लंडन : जग फिरावे असे कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला भ्रमंती करावी वाटते; परंतु मोजक्याच लोकांना हे स्वप्न साकार करता येते. मरिना पिरो नावाची एक महिला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडली आहे. या प्रवासात तिचा सोबती आहे तिचा पाळीव श्वान. मरिनाला जग पाहण्याचे वेड स्वस्थ बसू देत नव्हते. एक दिवस जुनी कार व श्वानाला सोबत घेऊन ती भ्रमंतीला निघाली. मरिनाचा श्वानावर एवढा जीव आहे की, ती त्याला सतत सोबत ठेवते. तिने कारचे घरात रूपांतर केले आहे. मरिनाने सलग दोन महिने खपून कारला घर बनविले. तिच्या कारमध्ये घरातील सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कारमध्ये घरासारखे पडदे लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर आरामशिर बिछाणा आणि किचनही आहे. मरिना विमानानेही जग भ्रमंती करू शकली असती. मात्र, श्वानाला एकटे सोडू शकत नसल्यामुळे तिने कारने प्रवास करण्याचे ठरविले. बस, रेल्वे आणि विमान कंपन्या श्वानाला सोबत घेऊ देत नाहीत. त्यामुळे आपल्याला हा पर्याय काढावा लागला, असे तिने सांगितले. इटलीत जन्मलेली मरिना सध्या ब्रिटनमध्ये राहते.
कारला घर बनवून जगभ्रमंती
By admin | Published: March 17, 2017 12:50 AM