संयुक्त राष्ट्र/जिनेव्हा :
भारत आणि इंडोनेशिया येथील उत्पादकांनी बनवलेल्या कफ सिरप आणि औषधांमुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, कारवाई करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केले आहे.
‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले की, गेल्या चार महिन्यांत, विविध देशांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकोलची वाजवीपेक्षा अधिक मात्रा असलेल्या बनावट औषध सेवनामुळे अनेक बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.
ही प्रकरणे किमान सात देशांतील आहेत. यापैकी तीन देशांमध्ये ३०० हून अधिक मृत्यू झाले. त्यात बहुतेक पाच वर्षांपेक्षा कमी वयाची लहान मुले आहेत, असे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. त्यामुळे दोषी कंपन्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे आवाहन ‘डब्ल्यूएचओ’ने केले आहे.