देश-परदेश : अमेरिका ओबामा
By admin | Published: February 01, 2016 12:03 AM
सहिष्णुतेसाठी ओबामा जाणार अमेरिकी मशिदीत
सहिष्णुतेसाठी ओबामा जाणार अमेरिकी मशिदीतवॉशिंग्टन : अमेरिकेत मुस्लिमांविरुद्ध निर्माण होत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सहिष्णुतेसाठी आणि धार्मिक स्वातंत्र्याचा बचाव करण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा पुढील आठवड्यात मशिदीला भेट देणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ओबामा यांनी मशिदीला भेट देण्याची पहिलीच वेळ असेल. शनिवारी व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्याने सांगितले की, ओबामा बुधवारी इस्लामिक सोसायटी ऑफ बाल्टिमोर मशिदीत जातील. तेथे ते समुदायाच्या नेत्यांशी राऊंडटेबल चर्चा करतील आणि त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडतील.आपल्या परदेश दौर्यात ओबामा यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या मशिदींना भेट दिली आहे; पण अमेरिकेत त्यांनी मशिदीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यांच्या कार्यकाळातील अंतिम वर्षात ओबामा यांनी राजकीय नेत्यांना मुस्लिमविरोधी वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन केले होते. विशेषत: रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली मुस्लिमविरोधी वक्तव्ये जगभर गाजली आहेत.