ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. १४ - लोकसंख्येमध्ये जगात पहिल्या स्थानावर असलेल्या चीनमध्ये स्पर्मची (शुक्रजंतू) टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी चीनने २० ते ४५ वयोगटातील पुरुषांना स्पर्म डोनेशनचे आवाहन केले आहे. देशासाठी तुम्ही तुमचे स्पर्म डोनेट करा असे आवाहन चीन सरकारकडून करण्यात आले आहे.
राजकीय आणि सांस्कृतिक कारणांमुळे चीनच्या स्पर्म बँकमध्ये मोठया प्रमाणावर कमतरता निर्माण झाली आहे. जे पुरुष स्वच्छेने स्पर्म डोनेशन करायचे त्यांचे प्रमाण निम्म्याहून खाली आल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
चीन सरकारच्या बदललेल्या धोरणानुसार आता प्रत्येक जोडपे दुसरे अपत्य जन्माला घालू शकते. यापूर्वी चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी दुसरे मुल जन्माला घालण्यावर बंदी होती. स्पर्म डोनेशन वाढले नाही तर, येत्या काळात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
त्यामुळे चीनने तरुणांना स्पर्म डोनेशनचे आवाहन केले आहे. तरुणांना स्पर्म डोनेशनसाठी आकृष्ट करण्यासाठी महागडया आयफोनचीही आमिषे दाखवली जात आहेत. चीनच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा वृद्धत्वाकडे झुकत चालला आहे. काही स्पर्म बँकांनी स्पर्म डोनेशनसाठी देशभक्तीच्या भावनेचा दाखला दिला आहे.