बर्लिन : अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संघटनेने (एनएसए) जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल व त्यांच्या निकटवर्तीय सल्लागारांच्या दूरध्वनी संभाषणावर अनेक वर्षे निगराणी (फोन टॅप केले) ठेवली. तसेच तर मर्केल यांच्या पूर्वपदस्थांचीही हेरगिरी केली होती, असे विकिलिक्सने म्हटले आहे. विकिलिक्सने जारी केलेल्या एका अहवालानुसार, मर्केल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एनएसएकडून होणारी हेरगिरी आधी वाटत होते त्याहून अधिक काळापासून होत असून, याची व्याप्तीही आधीच्या अंदाजाहून जास्त आहे. एनएसएने दीर्घकालीन निगराणीसाठी प्रमुख जर्मन अधिकाऱ्यांच्या १२५ दूरध्वनी क्रमाकांना लक्ष्य केले होते. विकिलिक्सच्या या गौप्यस्फोटामुळे अमेरिका व जर्मनीतील तणाव पुन्हा वाढण्याचा धोका आहे. उभय देश आपसातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच विकिलिक्सचे वृत्त आले आहे, हे उल्लेखनीय आहे. (वृत्तसंस्था)
न्यायालयाने मागितले पोलिसांचे स्पष्टीकरण
By admin | Published: July 11, 2015 1:38 AM