ढाका : बांगलादेशातील एका न्यायालयानेहिंदू साधू आणि इस्कॉनचे सहयोगी चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या खटल्यात जामीन देण्यास नकार दिला.
दास यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान त्यांच्या वतीने ११ वकिलांचा समूह उपस्थित होता. दास यांनी न्यायालयीन कामकाजात डिजिटल पद्धतीने सहभाग घेतला. ‘सुनावणी सुमारे ३० मिनिटे चालली, न्यायाधीशांनी फिर्यादी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला आणि नंतर दास यांचा जामीन अर्ज फेटाळला,’ असे न्यायालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दास हे यापूर्वी इस्कॉनशी संबंधित हो. आता ते बांगलादेश समिष्ट सनातनी जागरण जोत संघटनेचे प्रवक्ते आहेत. त्यांना २५ नोव्हेंबर रोजी ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती.