जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोना हा आजारच नाही असं म्हणून व्हायरसला नाकारणाऱ्या आणि मास्क न लावणाऱ्या व्यक्तीचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, कोरोनाच्या संकटात मास्क न वापरणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. कोरोनाच्या संसर्गाने त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनी व्हायरसच नाही असा दावा या व्यक्तीने केला होता.
गॅरी मॅथ्यू असं या 46 वर्षीय व्यक्तिचं नाव आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली आहे. गार्डियनच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यू मास्क घालण्यास कायम नकार देत असत. तसेच ते सोशल डिस्टंसिंगचं देखील पालन करत नसत. एका आठवड्यापूर्वी गॅरीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याची टेस्ट करण्यात आली त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गॅरी कोरोनाला आजाराला मानत नव्हता. त्यामुळेच कोणत्याचं नियमांचं पालन करत नव्हता. अनेकांनी त्याला मास्क लावण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याने त्यासाठी नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान कोरोना बळींची संख्या ही एक लाखांहून अधिक झाली आहे. मंगळवारी ब्रिटनमध्ये मृतांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या गंभीर परिस्थितीची जबाबदारी स्विकारत दु:ख व्यक्त केलं आहे. याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत आहे. कोरोना व्हायरसने झालेल्या मृत्यूमुळे मला खूप दु:ख झालं आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत संवेदना व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे.
परिस्थिती गंभीर! "या" देशात कोरोना बळींची संख्या एक लाखावर, पंतप्रधानांनी स्वीकारली जबाबदारी
कोरोनाच्या संसर्गाने अनेकांनी आपले आई-वडील, भाऊ-बहीण, मुलं गमावली आहेत. या कुटुंबीयांचे दु:ख मोठं असल्याचं जॉन्सन यांनी म्हटंल आहे. एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आमच्या सरकारने, मंत्र्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. या महामारीचा विचार करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी एक संधी आहे. लसीकरणानंतर रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मृत्यू आकलन प्रमाणपत्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एक लाख चार हजार जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच रुग्णांची संख्याही जास्त आहे.
कोरोना नाही हे सिद्ध करण्यासाठी एका व्यक्तीने चक्का एटीएम कॅश मशीन (ATM Cash Machines) चाटल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून सर्वच जण हैराण झाले आहेत. अमेरिकेत हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. एका व्यक्तीने फेसबुक लाईव्ह स्ट्रीम दरम्यान एटीएम मशीन चाटतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. फेसबुकवर एका युजरने हा व्हिडीओ पाहिल्यावर दक्षिण यॉर्कशायर पोलिसांना याची माहिती दिली. तसेच त्या युजरने याआधी ही अशीच घटना घडल्याचा दावा केला आहे. तसेच एटीएम चाटणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्यांदा ते चाटलं असून त्याला या कृतीतून कोरोना नाही हे सिद्ध करायचं असल्याचं म्हटलं जात आहे. मशीन चाटतानाचा हा व्हिडीओ सध्या फेसबुकवरून हटवण्यात आला आहे. दक्षिण यॉर्कशायर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.