कोरोना व्हायरसचा उगम चीनमध्येत झाल्याचं बोललं जातं. या व्हायरसनं अख्ख्या जगाला वेठीस धरलं आणि कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगात काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आता कमी होत आहेत. तर अजूनही काही देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. यातच तज्ज्ञांनी नवा दावा केला आहे की दक्षिण चीनमध्ये वटवाघळांमध्ये कोरोनासारखाच धोकादायक व्हायरस आढळून आला आहे. जो प्रत्येकी पाच मनुष्यामागे एकामध्ये संक्रमित होण्याची क्षमता ठेवतो. या व्हायरसला बीटीएसबाय-२ (BtSY2) नावानं ओळखलं जातं आणि याचा संबंध SARS-CoV-2 शी आहे.
तज्ज्ञांच्या दाव्यानुसार चीनच्या युन्नान प्रांतात वटवाघळांमध्ये आढळलेला धोकादायक व्हायरस मनुष्यप्राणी आणि प्राण्यांमध्ये पसरला तर अनेक रोगांना निमंत्रण मिळेल. याशिवाय वैज्ञानिकांच्या टीमनं अनेक संभाव्य पशुजन्यरोगाची माहिती दिली आहे की जे जनावरांच्या माध्यमातून माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतात. याशिवाय वैज्ञानिकांच्या टीमनं अनेक संभाव्य नव्या पशुजन्यरोगांबाबत माहिती दिली आहे की जे पशूंच्या माध्यमातून मनवामध्ये संक्रमित होऊ शकतात.
रिसर्चमधून समोर आली महत्वाची माहितीडेलीमेलच्या वृत्तानुसार हा रिसर्च शेन्जेनस्थित सन यात-सेन युनिव्हर्सिटी, युन्नान इन्स्टीट्यूट ऑफ एंडेमिक डिजीज कंट्रोल आणि सिडनी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. या रिसर्चचा अभ्यास होणं अद्याप बाकी आहे. "आम्हाला व्हायरसच्या पाच प्रजातींची ओळख पटली आहे की जे मनुष्य आणि प्राण्यांसाठी रोगजनक ठरू शकतात. यात एक रिकॉम्बिनेशन सार्ज जो कोरोना व्हायरससारखाच आहे. नवा व्हायरस SARS-CoV-2 आणि 50 SARS-CoV या दोन व्हायरसचा निकटवर्तीय आहे", असं तज्त्रांनी सांगितलं.
चीनमध्ये रुग्णसंख्येत वाढचीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. नॅशनल हेल्थ ब्युरोच्या अधिकृत आकडेवारीनुसार २५ नोव्हेंबरला चीनमध्ये ३५,१८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चीनमध्ये बीजिंग, ग्वांगझू आणि चोंगकिंग सारख्या शहरांमध्ये लाखो चीनी नागरिकांना विकेंडमध्येही घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीनच्या काही शहरांमध्ये लॉकडाऊन देखील करण्यात आलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत.