इस्त्राय़ल आणि फिलिस्तीन यांच्यातीव वाद वाढत चालला आहे. एका मागून एक असे हल्ले होऊ लागले आहेत. इस्त्रायलच्या तेल अवीवमध्ये फिलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
तेल अवीवच्या गर्दीच्या ठिकाणी रात्री कार घुसली होती. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. यावेळी बंदुकांमधून गोळ्याही झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या फायरिंगमध्ये एक व्यक्ती आणि दोन बहीणींचा मृत्यू झाला आहे. हा कार चालक अशाप्रकारे गर्दीत का घुसला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतू पोलिसांनुसार हा एक दहशतवादी हल्ला होता.
इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी यामागे फिलिस्तीनचा हात असल्याचे म्हटले आहे. इस्रायलने अल-अक्सा मशिदीवर केलेल्या कारवाईनंतर हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर रॉकेट हल्ले केले होते. लेबनॉनमधूनही इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले होते. यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीत हवाई हल्ल्यात हमासचा तळ उध्वस्त केला होता.
गाझा पट्टीवर हमासचे नियंत्रण आहे. इस्रायलने हमासला दहशतवादी संघटना म्हटलेले आहे. गेल्या काही काळात इस्त्रायलवर गाझापट्टीतून २५ आणि लेबनॉनहून ३४ रॉकेट डागले गेले होते.