रियाध : वादळी वाऱ्यामुळेच मक्का येथे ग्रॅण्ड मशिदीत क्रेन कोसळल्याचा दावा सौदी प्रशासनाने केला आहे. या दुर्घटनेत दोन भारतीय महिलांसह १०७ भाविक ठार झाले आहेत. हज यात्रा तोंडावर आली असतानाच ही दुर्घटना घडली असली तरी यात्रा ठरल्याप्रमाणे होईल, असे सौदीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारमुळे मशिदीत नेहमीपेक्षा जास्त भाविक जमले होते. मुलकी संरक्षण विभागाचे महासंचालक सुलेमान बिन अब्दुल्ला अल अमरोह यांनी अल-अरेबिया या टीव्ही वाहिनीला सांगितले की, अनपेक्षितरीत्या आलेल्या वादळामुळे क्रेन कोसळली. ही क्रेन छतावर कोसळणार आणि छत अंगावर पडणार याची मुळीच कल्पना भाविकांना नव्हती. वादळानंतर क्रेन कोसळल्याचे आपण पाहिले, असे मशिदीत काम करीत असल्याचा दावा करणारे अब्दुल अजीज नकूर यांनी सांगितले.
क्रेन दुर्घटनेची चौकशी सुरू
By admin | Published: September 13, 2015 2:13 AM