शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

इम्रान खान यांच्यावर दहशतवादाचा गुन्हा, ‘पीटीआय’चे डझनभर नेतेही रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:19 AM

Imran Khan : पीटीआय कार्यकर्ते आणि वाँटेड अशा १७ नेत्यांविरोधात गु्न्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्त जिओ वृत्तवाहिनीने दिले.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) डझनभर नेत्यांवर तोडफोड, सुरक्षा जवानांवर हल्ला, तसेच भ्रष्टाचारप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालय परिसराबाहेर गोंधळ घालण्यात सहभागी असल्याचा आरोप करीत पोलिसांनी दहशतवादविरोधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत रविवारी गुन्हा दाखल केला.

इम्रान खान तोशाखाना प्रकरणाच्या बहुप्रतीक्षित सुनावणीला हजर राहण्यासाठी लाहोरहून इस्लामाबादला आले होते, आणि न्यायालय परिसरातच त्यांचे समर्थक आणि सुरक्षा जवानांमध्ये झडप झाली. शनिवारी पीटीआय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान २५ सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब केली.

पीटीआय कार्यकर्ते आणि वाँटेड अशा १७ नेत्यांविरोधात गु्न्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्त जिओ वृत्तवाहिनीने दिले. पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी रविवारी सांगितले की, पक्ष खान यांच्या निवासस्थानी बेकायदेशीर कारवाई केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे ७० वर्षीय प्रमुख इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानच्या तिजोरीतील (तोशाखाना) मौल्यवान वस्तू विकल्याचा तसेच आपल्या संपत्ती विवरणपत्रात त्याचा उल्लेख लपवल्याचा आरोप पाकिस्तान निवडणूक आयोगाने केला असून याप्रकरणी दाखल याचिकेसंदर्भात इम्रान यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (एडीएसजे) जफर इक्बाल यांच्या न्यायालयात उपस्थित राहायचे होते. 

‘पीटीआय’वर बंदीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणारइम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला (पीटीआय) प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सरकार तज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहे, असे पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी सांगितले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला बंदी घालण्यात आलेला गट घोषित करायचा की, नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी सरकार आपल्या कायदेशीर टीमशी सल्लामसलत करेल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान