शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

"1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची पाकमध्ये बडदास्त"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 6:21 AM

दाऊद टोळीचे नाव न घेता भारताचा हल्लाबोल

न्यूयॉर्क : १९९३ साली मुंबईमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेला कुख्यात दहशतवादी व त्याच्या टोळीतील साथीदार पाकिस्तानमध्ये पंचतारांकित पाहुणचार झोडत आहेत. पाकिस्तानने त्यांना सुरक्षा व्यवस्थाही पुरविली आहे, असा जोरदार हल्लाबोल भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी दाऊद इब्राहिम टोळीचे नाव न घेता केला.ग्लोबल काऊंटर टेररिझम कौन्सिलने आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेत त्यांनी सांगितले की, दहशतवाद व संघटित गुन्हेगारी यांच्यात घनिष्ठ संबंध असतो. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. १९९३ साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडविणाऱ्या टोळीतील साथीदार पाकिस्तानात ऐषोआरामात जगत आहेत. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये राहात असल्याचे तेथील सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये मान्य केले होते. ८८ दहशतवादी गट व त्यांच्या प्रमुखांवर पाकिस्तानने अनेक निर्बंध लादले होते. त्यामध्ये दाऊद इब्राहिमचेही नाव होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रमुखपदी यंदाच्या वर्षासाठी टी. एस. तिरुमूर्ती यांची निवड झाली आहे. ते म्हणाले की, जगभरातील दहशतवाद्यांना पुरविली जाणारी आर्थिक तसेच शस्त्रास्त्रांची रसद तोडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी अनेक कडक निर्बंध घातले आहेत. मात्र त्या निर्बंधांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. (वृत्तसंस्था)भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोह्मद या पाकिस्तानी संघटनांचे अल् कायदाशी असलेले संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. अफगाणिस्तानात नुकत्याच घडलेल्या घटनांनी या दहशतवादी संघटनांना नवे बळ मिळाले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपली काम करण्याची पद्धत बदलली. सिरिया व इराकमधील आपली पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याकडे या संघटनेने आता लक्ष दिले आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ