चार महिन्यांपूर्वी २३९ प्रवासी घेऊन बीजिंगला जाणारे एक मलेशियन विमान बेपत्ता झाले होते. यात पाच भारतीय प्रवाशांचा समावेश होता. आठ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या या विमानाचा अद्याप शोध लागलेला नसतानाच मलेशियाच्या आणखी एका विमानाबाबत ही दुर्घटना घडली आहे. पूर्वीच्या अपघातानंतर आर्थिक संकटाच्या गर्तेत गेलेली मलेशियन एअरलाइन्स आता आणखी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. चौकशीसाठी आयोगाची नियुक्तीमलेशियन विमानाच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी युक्रेनने तात्काळ एका आयोगाची स्थापना करण्याचा आदेश दिला आहे. या विमानात सुमारे ३०० प्रवासी होते, यापैकी २३ अमेरिकी नागरिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. रशियन सीमेपासून ४० किलोमीटर अंतरावर ग्राबोव्हे गावाजवळ विमानाचे अवशेष, मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले आहेत, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा भाग रशियन बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जातो.दहशतवादी कृत्य?युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांनी हे ‘दहशतवादी कृत्य’ असल्याचा आरोप केला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मलेशियन पंतप्रधानांना फोन करून या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. हे विमान पाडण्यामागे रशियन बंडखोरांचा हात असल्याचा होरा आहे. त्यांनी यापूर्वी युक्रेनची काही विमाने पाडली आहेत. मलेशियन विमानास युक्रेनियन समजून चुकून त्यांच्याकडून हा हल्ला केला गेला असावा, असा होरा व्यक्त होतो.या घटनेचे दुरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात, असे ब्रिटनच्या रशियातील माजी राजदूत सर टोनी ब्रेन्टोन यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यांत युक्रेनच्या सैन्याची अनेक विमाने क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आली. यासाठी रशिया बंडखोरांना क्षेपणास्त्र पुरवून प्रोत्साहन देत असल्याचा आरोप युक्रेनद्वारे होत आहे. मात्र रशियाने सुरुवातीपासून हे आरोप फेटाळले आहे.विमान उड्डाणे रद्दब्रिटन, जर्मनी व रशियन एअरलाईन्सने विमानांचा मार्ग बदलण्याचे निर्देश दिले. ब्रिटिश परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, या भागातून जाणाऱ्या सर्व विमानांचे मार्ग बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जगभरातील सर्व पायलट्सना या मार्गाने जाण्याऱ्या विमानांचा रस्ता बदलण्यास सांगण्यात आले आहे. जर्मन एअरलाईन्स लुफ्तान्सा आणि रशियन ट्रान्सएअरो यांनी युक्रेनच्या हवाई हद्दीतून जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मलेशियन एअरलाइन्सवर संकट
By admin | Published: July 18, 2014 1:49 AM