लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : या महिन्यात जगभरात दररोज सरासरी १,६०० तंत्रज्ञान व्यावसायिकांना (टेक प्रोफेशनल) नोकरी गमवावी लागत आहे. त्याचवेळी जागतिक लेखा संस्था ‘पीडब्ल्यूसी’च्या वार्षिक सर्वेक्षणात भारतीय सीईओंनी म्हटले की, यंदा संकटाची स्थिती असली तरी भारताची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे भारतात कर्मचारी कपात अथवा वेतन कपातीची शक्यता नाही. जानेवारीत १५ दिवसांत ९१ टेक कंपन्यांनी २४ हजारपेक्षा अधिक तंत्रज्ञांना कामावरून काढले.
मजबूत स्थितीत भारत
- ८५% भारतीय सीईओंनी सांगितले की, त्यांची कोणत्याही प्रकारे कर्मचारी कपातीची योजना नाही.
- ९६% सीईओंनी वेतन कपातीची योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.
- ७८% सीईओंनी सांगितले की, १२ महिन्यांत जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची गती कमी होईल.
- ५७% सीईओंच्या मते अर्थव्यवस्थेच्या वाढीची सकारात्मक अपेक्षा आहे.
जागतिक पातळीवर मोठी आव्हाने असतानाही भारतीय सीईओ आर्थिक वृद्धीबाबत आशावादी आहेत. मात्र, बाह्य जोखिमेचा निपटारा करणे आणि नफा कायम ठेवणे यावर कंपन्यांना बारीक लक्ष द्यावे लागेल. -संजीव कृष्ण, चेअरमन, पीडब्ल्यूसी