इराक : जिहादी दहशतवाद्यांच्या विळख्यात सिंजर पर्वतावर अडकलेल्या हजारो इराकींसमोरील संकट गंभीर होत चालले आहे. संयुक्त राष्ट्रांनी ‘नरसंहाराची भीती’ व्यक्त केली आहे, तर अमेरिकेने आम्ही आमच्या मदत कार्याचा आढावा घेत असल्याचे बुधवारी सांगितले. इस्लामी राष्ट्राच्या जिहादी समूहांच्या सदस्यांवर सिंजर पर्वतावर अमेरिकेने हवाई हल्ले केले. सिंजर पर्वतावर २० ते ३० हजार लोकांना या दहशतवाद्यांनी घेरले असून त्यात बहुतांश याजिदी अल्पसंख्याक आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी विभागाने म्हटले आहे. हजारो याजिदी शरणार्थी सिरियाचा पहाड चढून व एक पूल ओलांडून बुधवारी इराकच्या स्वायत्त अशा कुर्द क्षेत्रात आले. त्यांच्याकडे अंगावरचे कपडे सोडले तर काहीही सामान नव्हते. कुर्द या तुलनेने सुरक्षित क्षेत्रात हे लोक आल्यावर त्यांच्यातील महिला थकलेल्या व मुले रडत होती.४५ वर्षांच्या महमूद बक्र यांनी सांगितले की, अजूनही मोठ्या संख्येने पहाडावर लोक असून त्यात चालताही न येणारे वृद्ध आहेत. त्यात माझे ७० वर्षांचे वडील असून ते एवढे अंतर चालू शकत नाहीत. पहाडावर खूप कमी जेवण व औषधांची सोय आहे. (वृत्तसंस्था)
पर्वतावर अडकलेल्या हजारो इराकींपुढील संकट वाढले
By admin | Published: August 14, 2014 2:02 AM