दररोज सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ ब्राझीलमधील असून, यात तलावात पोहणाऱ्या एका माणसाचा मगर पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. मगर मागे लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तो माणूनस किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात मगर त्याच्यावर मागून हल्ला करते.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलमधील कॅम्पो ग्रांडे येथील लागो दा आमोर येथे शनिवारी ही घटना घडली. हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, परंतु मगरींच्या उपस्थितीमुळे तेथे पोहण्यास मनाई आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की, पोहणाऱ्या व्यक्तीने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून तलावात पोहण्यासाठी गेला. पण, अखेर त्याला आपल्या चुकीची शिक्षा मिळालीच.
घटना मोबाईलमध्ये कैदही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद करणार्या विलियन कॅटानोने दुपारी 4.40 च्या सुमारास त्या व्यक्तीला नदीत प्रवेश करताना पाहिले. काही वेळातच नदीच्या पलीकडे एक मगर वेगाने त्या व्यक्तीच्या दिशेने येताना दिसली. मगर येताना पाहून व्यक्तीने शक्य तितक्या वेगाने किनाऱ्यावर पोहण्याचा प्रयत्न केला. पण, किनाऱ्यावर येण्यापूर्वीच मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा हाताला जोराचा चावा घेतला. सुदैवाने मगरीच्या हल्ल्यात त्या व्यक्तीचा जीव वाचला असला तरी, त्याच्या हाताला चावल्याची जखमी झाली आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेनंतर स्थानिक लोक जखमी व्यक्तीभोवती जमा झाले आणि आपत्कालीन सेवेला कॉल केला. त्या व्यक्तीच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने यात त्याचा जीव वाचला आहे. दरम्यान, या घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, 1.9 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर, 7800 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.