सिंगापूर : अमेरिकी पुरवठ्यातील घसरण आणि नायजेरियातील तेल उत्पादनातील संभाव्य घट, यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गुरुवारी आणखी वाढल्या. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे दर ३२ सेंटांनी वाढून ५१.५५ डॉलर प्रति बॅरलवर गेले. ही वाढ ०.६२ टक्का आहे. जुलैनंतरची ही सर्वोच्च वाढ ठरली आहे. ब्रेंट क्रूड तेलाचे दर २२ सेंटांनी अथवा ०.४२ टक्क्याने वाढून ५२.७३ डॉलरवर गेले. आॅक्टोबरनंतरची ही सर्वोच्च वाढ ठरली आहे. (प्रतिनिधी)
कच्चे तेल आणखी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 4:22 AM