वॉशिंग्टन: एका आयटी कर्मचाऱ्याला त्याचा हार्ड ड्राईव्ह हरविल्याने खूप मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. 2013 मध्ये जेम्सचा आयटी इंजिनिअर हॉवेल्सने चुकून त्याचा हार्ड ड्राईव्ह कचऱ्यात फेकला होता. या हार्ड ड्राईव्हमध्ये एक क्रिप्टोग्राफिकचा पासवर्ड सेव्ह केलेला होता. हा पासवर्ड एवढा महत्वाचा आहे, की त्यामध्ये थोडे थोडके नव्हेत तर 34 अब्ज रुपये अडकले आहेत. या आयटी इंजिनिअरने आता नासाकडे मदत मागितली आहे.
बिटकॉईनचा अॅक्सेस मिळविण्यासाठी या की चा वापर केला जातो. आजच्या तारखेला हॉवेल्सकडे 340 दशलक्ष पाऊंडचे बिटकॉईन्स आहेत. याची भारतीय रुपयांत किंमत 34,50,60,56,000 एवढी आहे. हॉवेल्सनुसार त्याची संकटे कमी होण्यापेक्षा वाढत चालली आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून त्याला तो हार्ड ड्राईव्ह शोधायचा आहे, परंतू त्याला अधिकारी त्याची परवानगी देत नाहीएत. हॉवेल्सने प्रशासनाला त्यातील 25 टक्के रक्कम शहराच्या कोविड रिलिफ फंडाला देण्याचा प्रस्ताव देखील दिला आहे. मात्र, तरीही अधिकारी त्याचे ऐकायला तयार नाहीत.
हॉवेल्सने आता शेवटचा पर्याय म्हणून जगभरातील इंजिनिअर, पर्यावरणवादी आणि डेटा रिकव्हरी तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे. यासाठी त्याने ऑनट्रॅक कंपनीची देखील मदत घेतली आहे. डेटा रिकव्हरी फर्मने 2003 मध्ये पृथ्वीवर कोसळल्यानंतर कोलंबिया अंतराळ यानातून जळालेल्या आणि खराब झालेल्या हार्ड ड्राईव्हमधून डेटा काढला आहे. नासा देखील डेटा रिकव्हरीसाठी या कंपनीची मदत घेते.
हॉवेल्सने नासाच्या इंजिनिअरांकरवी या फर्मची मदत मागितली आहे. जर त्याची हार्ड ड्राईव्ह तुटली नसेल तर ती की मिळण्याची 80 ते 90 टक्के शक्यता आहे. 2013 पासून हॉवेल्स ही हार्ड ड्राईव्ह शोधत आहे. न्यूपोर्ट सिटी काऊंसिलला शोधण्यासाठी गळ घालत आहे. मात्र ते पर्यावरण आणि आर्थिक ओझ्याचा हवाला देऊन परवानगी देत नाहीएत.