हवाना- क्युबामध्ये विमान दुर्घटनेत 100हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हवानाच्या जोस मार्टी या विमानतळावरून बोइंग 737-200 या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात ते दुर्घटनाग्रस्त झाले.या विमानातून 104 प्रवासी प्रवास करत होते. डी अॅव्हियाकियान या एअरलाइन्सचं हे डोमेस्टिक विमान होते. हवानावरून क्युबाच्या पूर्वेकडील होलगुइनकडे जात असताना स्थानिक वेळेनुसार दुपारच्या 12.08 वाजता हे विमान कोसळले. जोस मार्टी विमानतळजवळ असलेल्या सॅंटियागो दे लास व्हॅजेस या शेती असलेल्या भागात हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झालं असून, स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे.क्युबा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डाइझ कॅनेलही घटनास्थळी दाखल झाले आहेत. यापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे डी अॅव्हियाकियान या एअरलाइन्सनं अनेक विमानांचं उड्डाण रद्द केले होते. परंतु विमान दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Cuban air crash : क्युबामध्ये विमान दुर्घटनेत 100हून अधिक प्रवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 3:41 AM