बीजिंग : डोकलाममधील तणाव कमी करण्यासाठी चीन कोणतीही तडजोड करणार नाही. डोकलाममधून भारतीय सैन्य मागे न हटल्यास आम्हाला बळाचा वापर करावा लागेल आणि त्याच्या परिणामासाठी भारताने तयार राहावे, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे. भारतीय पत्रकारांनी नुकताच चीन दौरा केला आहे. या पत्रकारांजवळ पीएलएच्या विश्लेषकांनी हे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे डोकलाम हा आमचाच भाग आहे, असे म्हणत भूतानने चीनचा दावा फेटाळून लावला आहे.डोकलाम आमचा भाग नाही, असे भूतानने मान्य केले असल्याचा दावा चीनतर्फे बुधवारी करण्यात आला होता. पण तो भूतानने फेटाळून लावला. डोकलाममध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सुरू केलेले रस्त्याचे काम भारतीय सैन्याने रोखल्यानंतर संघर्षाची ठिणगी पडली आहे.डोकलाम भागात भारताच्या ज्या हालचाली आहेत त्यामुळे चीन सरकार आणि येथील नागरिक नाराज आहेत, असे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वरिष्ठ कर्नल झोउ बो म्हणाले की, चीनने अद्याप ‘आक्रमण’ शब्दाचा उपयोग केला नाही. आम्ही ‘अतिक्रमण’ शब्दाचा उपयोग केला आहे. हा चीनचा चांगुलपणा आहे. त्यामुळे भारताने विनाअट येथून मागे हटावे.चीनची पावले चिथावणीखोरचीनने डोकलाममध्ये चिथावणीखोर पावले उचलली आहेत. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे, असे मत अमेरिकेतील काँग्रेसचे संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)भारत-चीनने नवाकरार करावा१८९०च्या ग्रेट ब्रिटन - चीन कराराऐवजी आता भारत व चीनने सिक्किम क्षेत्रावर नवा करार करावा, असे मत वरिष्ठ कर्नल झोउ शियाओझोउ यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमेच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम भागात विवाद आहेत. पूर्वी करार झाला तेव्हा पीपल्स रिपब्लिकन चायना (पीआरसी)नव्हते. भारतही १९४७मध्ये स्वतंत्र झाला. त्यामुळे याबाबत नव्याने करार करावा, असे ते म्हणाले.डोकलामजवळील गावातील लोकांना अन्यत्र जाण्याच्या सूचनाभारतीय सैन्याने डोकलाम येथून ३५ किलोमीटरवर असलेल्या नाथांग गावातून गावकºयांना बाहेर जायला सांगितल्याचे वृत्त आहे. गावकºयांना स्थलांतर करण्यास का सांगितले, हे स्पष्ट झालेले नाही.काहींच्या म्हणण्याप्रमाणे लष्कराच्या ३३ कॉर्प्सच्या जवानांना तिथे आणण्यात येणार आहे. त्यासाठी गावकºयांना गाव सोडायला सांगितले असावे.मात्र चीनने लष्करी कारवाई केली आणि त्यातून चकमकी सुरू झाल्या, तर त्याचा फटका गावकºयांना बसू नये, यासाठी भारतीय सैन्याने हा निर्णय घेतला असावा, असे बोलले जाते.नाथांग गावात काही दिवसांपासून भारतीय सैनिकांची संख्या वाढत चालली आहे, असे गावकºयांचेही म्हणणे आहे. मात्र गावकºयांना हे का सुरू आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.दरवर्षी सप्टेंबरमध्ये लष्करातर्फे त्या भागांत वार्षिक सराव केला जातो. यंदा तो आधी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे तिथे भारतीय सैनिकांची संख्या वाढली आहे, असे लष्करातील एका अधिकाºयाने सांगितले.
डोकलाम मुद्द्यावर तडजोड नाही, अन्यथा बळाचा वापर : चीनचा भारताला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:17 AM