फुजैराह (संयुक्त अरब अमिरात) : अमेरिका आणि इराण यांच्यात आधीच तणाव निर्माण झालेला असताना आखातात आमच्या तेलाच्या दोन टँकर्सची गूढ अशा ‘घातपाती हल्ल्यात’ हानी झाली, असे सौदी अरेबियाने सोमवारी म्हटले. यामुळे तणाव वाढला आहे.अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी इराणच्या प्रश्नावर युरोपियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आपली नियोजित मॉस्को भेट रद्द केली व ते ब्रुसेल्सला रवाना झाले. सागरी सुरक्षेला विस्कळीत करण्याच्या विदेशी शक्तींकडून होणा-या साहसवादावर इराणने इशारा दिला आहे. भीती निर्माण करणाºया हल्ल्यांची चौकशी करण्याची मागणीही इराणने केली आहे. आखातात ‘अपघाताने’ निर्माण होणाºया संघर्षातील धोक्याबद्दल ब्रिटनने इशारा दिला आहे. या भागात अमेरिकेने आधीच आपली लष्करी सिद्धता बळकट केली आहे. त्यात स्ट्रॅटेजिक बी-५२ बाँबर्सचा समावेश असून, इराणने दिलेल्या कथित धमक्यांना त्याद्वारे तोंड देता येईल.संयुक्त अरब अमिरातने रविवारी म्हटले की, वेगवेगळ्या देशांच्या चार व्यापारी जहाजांना फुजैराहपासून दूर घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री खालिद अल- फालिह म्हणाले की, दोन टँकर्सची लक्षणीय म्हणता येईल, अशी हानी असली तरी कोणाचा मृत्यू झालेला नाही की समुद्रात तेल पसरले नाही.सागरी सुरक्षेला निर्माण झाला धोकासौदी अरेबिया व इराण यांच्यात कमालीचे शत्रुत्व असून, संयुक्त अरब अमिरातीच्या हद्दीतील समुद्रात व्यापारी आणि नागरी जहाजांना घातपात करण्याच्या कृत्यांचा सौदी अरेबियाने निषेध केला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. या गुन्हेगारी कृत्यांमुळे समुद्रातील जहाजांच्या येण्या जाण्याला व सागरी सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि विभागाची व आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेवर विपरीत परिणाम झाला आहे, असे सूत्रांनी म्हटले.
आमच्या तेलाच्या दोन टँकर्सची घातपाती हल्ल्यात हानी : सौदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:00 AM