एकीकडे बऱ्याच देशांना टँकर विमानातून लढाऊ विमानांमध्ये हवेतल्या हवेत इंधन भरणे शक्य झालेले नसताना अमेरिकेने ड्रोनद्वारे लढाऊ विमानात इंधन भरण्याचा कारनामा करून दाखविला आहे. अमेरिकी नौदलाच्या मानवरहित टँकर ड्रोनने हवेतच F/A-18 सुपर हॉर्नेट लढाऊ विमानात इंधन भरून इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या या कारनाम्यामुळे सारी दुनिया हैरान झाली आहे. (American Navy made history June 4 conducting the first ever refueling operation between the MQ-25 T1 unmanned tanker and the F/A-18 Super Hornet.)
भारतभूमीवर पोहोचण्याआधीच राफेलचे शक्तीप्रदर्शन; हवेतल्या हवेतच भरले इंधन
ड्रोनमधून लढाऊ विमानात इंधन भरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला आहे. हा प्रयोग इलिनोइसच्या मस्कौटामध्ये मिडअमेरिका विमान तळाच्या भागात करण्यात आला. हे ड्रोन अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांद्वारे ऑपरेट केले जाण्याची योजना आहे. यामुळे लढाऊ विमानांना वारंवार इंधन भरण्यासाठी खाली उतरावे लागणार नाही. असे झाल्यास भर समुद्रात युद्धावेळी हवेतल्या हवेत आरामात इंधन भरता येणार आहे.
युद्धनौंकांवरून उड्डाण करणे आणि उतरणे हे खूप जिकीरीचे काम असते. कमी धावपट्टी असल्याने मोजक्याच अंतरावरून हेलकावे घेत हवेत झेपावणे आणि पुन्हा कमी अंतरावर विमान थांबविणे हे कठीण असते. यामुळे समुद्रातच हवेतल्या हवेत विमानात इंधन भरता येणे आता सोपे होणार आहे. यामुळे विमानांचे अपघातही होण्याची शक्यता कमी होणार आहे.