ऑनलाइन लोकमत
टोरोन्टो, दि. २२ - सोशल नेटवर्किंगच्या जगात लोकप्रिय असलेली डेटिंगची अॅशले मेडिसन डॉट कॉम ही वेबसाइट हॅक करण्यात आली असून हॅकर्सनी या वेबसाइटवर युजर्सनी अपलोड केलेले सर्व नग्न फोटो आणि क्रेडिट कार्डची माहिती उघड करण्याची धमकी दिली आहे.
अॅशले मेडिसनचा वापर करणारे सुमारे ३.७ कोटी युजर्स आहेत. या वेबसाईटच्या आधारे विवाहबाह्य संबंध ठेवणारे लोक आणि अविवाहित तरुण आपल्या डेटिंग पार्टनरचा शोध घेतात. यामध्ये त्यांनी अपलोड नग्न फोटो, नाव, पत्ता आणि क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती दिली आहे. मात्र, आता जगात डेटिंगची दुस-या क्रमांकाची असलेली अॅशले मेडिसन वेबसाइटच हॅक झाल्याने सर्वच युजर्स चिंताग्रस्त झाले आहेत.
दरम्यान, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून कोणत्याही युजर्सचा डेडा हॅक न होण्याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती अॅशले मेडिसनने दिली आहे.