ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या विदेशातल्या तब्बल २६ मालमत्तांचा छडा भारतीय सुरक्षा यंत्रणांनी लावल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले असून त्यातल्या अनेक मालमत्ता इंग्लंड, टर्की, मॉरीशस आदी देशांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंडच्या दौ-यावर जाणार असून दोन्ही देशांच्या वाढत्या संबंधांचा विचार करता इंग्लंड सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. दाऊद इब्राहीमच्या मालमत्ता या बेनामी असण्याची शक्यता असली तरी त्याचा व्यवस्थित माग लावत तपास यंत्रणांनी अत्यंत कसोशीने या मालमत्तांचा शोध लावल्याचे व त्यांचा दाऊदशी संबंध दाखवणारा पुरावा गोळा केल्याचे वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.
पाकिस्तानमध्ये असलेल्या दाऊदच्या वास्तव्याचा आणि त्याच्या तिथल्या मालमत्तांचा पाकिस्तान सरकारने सातत्याने इन्कार केला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सहाय्य होत असल्यामुळे अन्य देशांमध्ये पसरलेल्या दाऊदच्या साम्राज्याला संपवण्याचा बारतीय सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.