शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दाऊदला झटका! ब्रिटनमधील मालमत्ता जप्त, ४ हजार कोटींवर आणली टाच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 1:43 AM

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दाऊदची एकूण मालमत्ता ६.७ बिलियन डॉलर म्हणजे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या आसपास असून, त्यापैकी तब्बल ४ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ब्रिटनमध्ये टाच आणण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दाऊदची एकूण मालमत्ता ६.७ बिलियन डॉलर म्हणजे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या आसपास असून, त्यापैकी तब्बल ४ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ब्रिटनमध्ये टाच आणण्यात आली आहे.ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमचे हॉटेल आणि कित्येक घरे आहेत, त्यांची किंमत काही हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या महिन्यातच ब्रिटन सरकारने आर्थिक निर्बंधांसंबंधीच्या यादीमध्ये दाऊद इब्राहिमचा समावेश केला होता. या संदर्भात भारतानेही ब्रिटनला पूर्वीच आपला अहवाल सुपुर्द केला आहे.गेल्या महिन्यात ब्रिटनकडून मालमत्ता गोठविण्याच्या संदर्भात काही जणांची यादी जारी करण्यात आली होती. त्यात दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील ३ मालमत्तांचाही उल्लेख होता. ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या यादीत, दाऊद पाकिस्तानातील ३ मालमत्तांचे पत्तेही देण्यात आले होते.फोर्ब्स मासिकाने जगातील मोस्ट वाँटेड डॉन असलेल्या दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर एवढी असल्याचे म्हटले होते. दाऊद हा जगातील क्रमांक दोनचा सर्वाधिक श्रीमंत डॉन असल्याचे मानले जाते. त्याची भारतातही काही बेनामी मालमत्ता असल्याचे सांगण्यात येते. भारत, पाकिस्तान, ब्रिटन या देशांखेरीज दक्षिण आफ्रिकेत व अन्य काही छोट्या राष्ट्रांत त्याच्या मालमत्ता आहेत. (वृत्तसंस्था)डॉनच्या पाकिस्तानातील मालमत्तांचे पत्ते१ ) हाउस नं. ३७, मार्ग क्रमांक ३0, डिफेन्स हाउसिंग अथॉरिटी, कराची.२) नूराबाद, कराची, पाकिस्तान३) व्हाइट हाउस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन, कराची.आधीही आली होती टाचदाऊदची अनेक अरब व मुस्लीम राष्ट्रांत गुंतवणूक, उद्योग व मालमत्ता आहे. संयुक्त अरब अमिरातीने या वर्षीच्या जानेवारी महिन्यात त्याच्या १५ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.एकूण संपत्ती ४५ हजार कोटी रुपये

टॅग्स :Indiaभारत