- लोकमत न्यूज नेटवर्कजगभरात तंबाकू आणि तंबाकूजन्य पदार्थांमुळे लाखो लोकांचा बळी गेला आहे. सिगारेट बनवणार्या कंपन्यांवर त्यामुळे जगभरातून कायमच टीका केली जाते आणि तंबाकूमुळे मृत्यूमुखी पडणार्या लोकांबाबत त्यांना जबाबदारही धरलं जातं. अर्थातच त्यामुळे जगातील अनेक देशांनी या कंपन्यांवर निर्बंध आणले आहेत. त्यांच्यावरील टॅक्स सातत्यानं वाढता ठेवतानाच या वस्तूंची किंमतही कायमच वाढती राहिलेली आहे. तरीही धुम्रपान करणार्यांच्या संख्येत किंवा धुम्रपान करणार्या लोकांनी तातडीनं धुम्रपान सोडलं असं कधी झालेलं नाही. कोरोनाच्या काळात मात्र आता या कंपन्या पुन्हा सक्रीय झाल्या असून कोरोना प्रतिबंधित लस शोधण्याच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच्या संशोधनाला मोठा निधी त्यांनी पुरवायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे जी तंबाकू अतिशय घातक समजली जाते, त्याच तंबाकूच्या रोपापासून कोरोनाला अटकाव करू शकणारी अतिशय प्रभावी लस तयार करण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आम्ही पोहोचलो आहोत, सर्व टेस्टिंग योग्य आल्या, चांगले पार्टनर्स मिळाले आणि सरकारनंही पाठिंबा दिला, तर लवकरच ही लस आम्हाला मार्केटमध्ये आणता येईल असा दावाही त्यांनी केला आहे. ‘ब्रिटिश अमेरिकन टोबॅको’ (बॅट) या कंपनीतर्फे ‘लकी स्ट्राइक’, ‘डनहिल’, ‘रॉथमन्स’, ‘बेन्सन अँण्ड हेजेस’ असे सिगारेटचे अनेक प्रसिद्ध बॅ्रण्ड्स तयार केले जातात. त्यांचं म्हणणं आहे, सगळं काही सुरळीत झालं तर, येत्या जूनपासून आम्ही या लसच्या उत्पादनाला सुरुवात करू!
जीवघेणी तंबाकू, जीवही वाचवेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 11:18 PM
कोरोनाच्या काळात सिगारेट कंपन्या पुन्हा सक्रीय झाल्या असून कोरोना प्रतिबंधित लस शोधण्याच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देजी तंबाकू अतिशय घातक समजली जाते, त्याच तंबाकूच्या रोपापासून कोरोनाला अटकाव करू शकणारी अतिशय प्रभावी लस तयार केली जात आहे.