ऑनलाइन लोकमत
कैरो, दि. 23 - इजिप्तच्या सागरी किना-यावर निर्वासितांची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तब्ब्ल 148 जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो निर्वासित युरोपच्या दिशेने प्रवास करत असताना बोट उलटली. बुधवारी ही दुर्घटना घडली. तीन दिवसानंतरही मृतदेह शोधण्याचे काम सुरु असून आत्तापर्यंत 148 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीने दिलं आहे.
मच्छिमारांच्या बोटच्या सहाय्याने शोधकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. पोहता येत नसल्याने बोट बुडाल्यानंतर ते आपला बचाव करु शकले नाहीत. बोटीमध्ये 600 प्रवासी होते अशी शक्यता स्थानिक वृत्तवाहिनीने वर्तवली आहे.
युरोपला समुद्रामार्ग प्रवास करण्यासाठी इजिप्त हाच मार्ग निर्वासितांकडून वापरण्यात येतो. 2014 पासून निर्वासितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यावर्षी तब्बल वेगवेगळ्या देशाचं नागरिकत्व असलेल्या तब्बल 4600 जणांना अटक करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत निर्वासितांचा आकडा 28 टक्क्यांनी वाढला आहे.