ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 6 - दात न घासल्याने रागाच्या भरात आईने केलेल्या मारहाणीत चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. मारहाण करताना पोटात लात घातल्याने मुलीचा मृत्यू झाला. हेर्नाडेझ असं या महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. मेरीलँडमध्ये ही घटना घडली आहे.
मुलही नोहालीचा मृत्यू झाल्यानंतर हेर्नाडेझने बनाव करत पोलिसांना आपली मुलगी बेशुद्ध अवस्थेत घरी पडली असल्याचा फोन केला. नोहाली आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती, पण 15 मिनिटे झाली तरी ती बाहेर न आल्याने मी जाऊन पाहिलं असता ती बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसलं असं हेर्नाडेझने पोलिसांना सांगितलं होतं.
पोलिसांनी नोहालीला रुग्णालात दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या शरीरावर जखमा आढळल्या, तसंच तिला हेट ट्रॉमा झाल्याचंही निष्पन्न झालं. त्यानंतर तिला वॉशिंग्टन डीसीला उपचारासाठी नेण्यात आलं, तिथे तिचा मृत्यू झाला.
हेर्नाडेझने आपण मारहाण केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.