काबूल : अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात शनिवारी झालेल्या ६.३ रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात मृतांची संख्या २ हजारांवर पोहोचली आहे. जखमींची संख्या ९ हजारांपेक्षा अधिक असून, भूकंपामुळे ६ गावे नष्ट झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अद्याप दबलेले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन दशकांतील हा देशातील सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक आहे.
माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी सांगितले की, हेरातमधील भूकंपात मृतांचा आकडा सतत वाढत आहे. संयुक्त राष्ट्राने ४६५ घरे जमीनदोस्त आणि १३५ घरांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले. जून २०२२ मध्ये, अफगाणमध्ये शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्यात किमान १ हजार लोक ठार झाले होते.
भूकंप आणि त्यानंतरच्या धक्क्यांचा सर्वात जास्त परिणाम हेरात प्रांतातील जेंदा जन जिल्ह्यातील चार गावांवर झाला.
२००० - मृत्यू९००० - जखमी४६५ - घरे जमीनदोस्त१२५ - घरांचे नुकसान