द हेग : नेदरलँडच्या संरक्षणमंत्री अँक बीजलेवेल्ड या भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात सहभागी होणार आहेत. यानिमित्त पाठविलेल्या संदेशात बीजलेवेल्ड यांनी भारताचे योगासारखी देणगी जगाला दिल्याबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, नेदरलँडचे लष्कर मागील १५ वर्षांपासून योग करीत आहे. भारतीय दूतावासाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, नेदरलँडच्या लष्करात १३0 पेक्षा अधिक योग प्रशिक्षक आहेत. या समारंभात नेदरलँडचे लष्कर आणि पोलीस प्रतिनिधी यांची एक कार्यशाळा होईल.>अमेरिकेतील योगप्रेमी आभासी उत्सवासाठी सिद्धयोग दिनानिमित्ताने भारतीय दूतावासांकडून जगभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र कोविड-१९ मुळे सार्वजनिक कार्यक्रम अशक्य ठरले आहेत. त्यामुळे बहुतांश दूतावासांनी डिजिटल कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन अमेरिकेतही उत्साहात साजरा केला जातो.टेक्सास आणि आजूबाजूच्या राज्यांत मोठ्या संख्येने योगप्रेमी लोक आहेत. यंदाच्या योगदिनी त्यांनी आपापल्या घरातून आभासी पद्धतीने कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी करून ठेवली आहे. योगगुरू रामदेवबाबा यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग यानिमित्ताने होणार आहे.>व्हिडिओ ब्लॉगिंक स्पर्धालोकांत जागृती निर्माण करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) यांच्या वतीने संयुक्तरीत्या ‘माय लाईफ माय योगा’ (माझे जीवन माझा योग) या नावाची व्हिडिओ ब्लॉगिंक स्पर्धा घेण्यात आली. ३१ मार्च रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.ही स्पर्धा दोन पातळ्यांवर होत आहे. पहिल्या पातळीत देशातून विजेते निवडले जातील. त्यानंतर जागतिक पातळीवर विविध देशांतून विजेते निवडले जातील. स्पर्धकांना तीन मिनिटांचा व्हिडिओ यात अपलोड करावयाचा आहे. व्हिडिओत क्रिया, आसन, प्राणायाम, बंध आणि मुद्रा यापैकी कोणत्याही तीन योग अंगांचा समावेश असणे आवश्यक आहे.फेसबुक, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्रामवर योग्य हॅशटॅगसह हे व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे. भारतातील विजेत्यांना १ लाख रुपये, ५0 हजार रुपये आणि २५ हजार रुपये, अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिसे दिली जाणार आहेत. भारतीय दूतावासाच्या वतीने विदेशातील प्रत्येक देशातील विजेत्यांना स्वतंत्रपणे अशीच तीन बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यांची रक्कम अनुक्रमे २,५00 डॉलर, १,५00 डॉलर आणि १,000 डॉलर असेल. मायगव्ह डॉट गव्ह डॉट इन या वेबसाईटसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर होत असलेली ही व्हिडिओ ब्लॉगिंक स्पर्धा रविवारी संपणार आहे. त्यानंतर विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
नेदरलँडच्या संरक्षणमंत्री ऑनलाइन योग समारंभात सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 3:05 AM