टोकियो : ९६ वर्षांचे जपानी नागरिक शिगेमी हिराता पदवी प्राप्त करणारे जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी सिरॅमिक आर्टस्मधील पदवी मिळवली असून, त्यांच्या या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली. या वर्षीच्या प्रारंभी आर्ट अॅण्ड डिझायनच्या क्योटो विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळविल्यानंतर शेगेमी हिराता यांना शुक्रवारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. १९१९ साली हिरोशिमा येथे जन्मलेले हिराता या विक्रमामुळे पंचक्रोशीत सेलीब्रेटी बनले आहेत. ‘योमिउरी’ दैनिकाला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांची मला नावे माहीत नाहीत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. यामुळे मला खूप ऊर्जा मिळाली. मात्र, आपण कोणताही विक्रम केला नसल्याचे ते जोर देऊन सांगतात. ते म्हणाले की, माझे लक्ष्य १०० वर्षे जगण्याचे आहे. मी जर आणखी तंदुरुस्त राहिलो असतो तर कॉलेजमध्ये जाणे मजेशीर राहिले असते. हिराता यांनी दुसऱ्या महायुद्धात नौदलात काम केले असून, त्यांना चार खापरपणतू आहेत. मी खूपच आनंदी आहे. या वयात नवे शिकण्यात सक्षम असणे खूपच मजेदार आहे.
९६व्या वर्षी पदवी
By admin | Published: June 05, 2016 3:59 AM