नवी दिल्ली : डेन्मार्कमधील काॅपेनहेगेन हे शहर जगातले सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. जगभरातील सर्वात सुरक्षित शहरांबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात काॅपेनहेगेन शहराने बाजी मारली आहे. या यादीत भारताची राजधानी नवी दिल्लीचा समावेश पहिल्या ५० शहरांमध्ये आहे; मात्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटी आहे, तसेच पहिल्या दहा शहरांमध्ये भारतीय उपखंडातील एकही शहर नाही.
‘इकाॅनाॅमिस्ट इंटेलिजेन्स युनिट‘ने हे सर्वेक्षण केले हाेते. या संस्थेद्वारे २०१५ पासून सुरक्षित शहरांबाबतचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यावर्षीच्या यादीत काॅपेनहेगेननंतर दुसऱ्या स्थानी कॅनडाचे टाेराँटाे, तिसऱ्या स्थानावर सिंगापूर आणि चवथ्या स्थानी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराचा क्रमांक आहे. यावर्षी एकूण ६० शहरांच्या यादीत प्रथमच नवी दिल्ली आणि मुंबईचा समावेश झाला आहे. दिल्ली ४८ व्या तर मुंबई ५० व्या स्थानी आहे.
सुरक्षित शहर ठरविण्यासाठी एकूण ७६ निकष लावण्यात आले हाेते. त्यात आराेग्य, पायाभूत सुविधा, डिजिटल, पर्यावरण सुरक्षा, इत्यादी निकषांच्या आधारे शहरांना गुण देण्यात आले. यावर्षी क्रमवारी ठरविताना काेराेना महामारीचादेखील विचार करण्यात आला.
टाॅप टेन सुरक्षित शहरेकाॅपेनहेगेन, टाेराँटाे, सिंगापूर, सिडनी, टाेकियाे, ॲमेस्टरडॅम, वेलिंग्टन, हाँगकाँग, मेलबाेर्न, स्टाॅकहाेम.