संयुक्त राष्ट्रे : जगातील एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोक २०५० सालापर्यंत शहरवासी झालेले असतील. हे दृश्य भारत, चीन, नायजेरिया या देशांत प्रकर्षाने पाहायला मिळेल. जपानमधील टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून तिथे ३.७ कोटी लोक राहातात. मात्र २०२८ पर्यंत सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली टोकियोला मागे टाकेल, असे संयुक्त राष्ट्रांनी अहवालात म्हटले आहे.संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक घडामोडीविषयक विभागाच्या लोकसंख्याविषयक गटाने हा अहवाल तयार केला. परंतु नंतर २०५० पर्यंत लोक शहरांकडे मोठ्या प्रमाणावर वळतील. चीन हा जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. मात्र चीनला भारतही मागे टाकण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.लोकसंख्याविषयक गटाचे संचालक जॉन विल्मथ यांनी सांगितले की, जेव्हा शहरीकरणाचा वेग वाढतो, त्या वेळी त्या ठिकाणच्या लोकांना घरे, पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, आरोग्य तसेच स्वच्छताविषयक सोयीसुविधा पुरविणे हे एक आव्हानच असते. सध्या जगातील ५५ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. मात्र २०५० पर्यंत हे प्रमाण ६८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.या शहरीकरणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांना आरोग्य व शिक्षणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध होतील. अनेक देशांत शहरीकरणाचा झपाटा मोठा आहे.>२०३० साली असतील ४३ मेगासिटीजगात १९९० साली प्रत्येकी १ कोटी किंवा त्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या फक्त १० मेगासिटी ( महानगर) होत्या. मात्र २०१८ साली जगभरात अशा प्रकारच्या मेगासिटीची संख्या ३३ झाली असून २०३० सालापर्यंत ती ४३ पर्यंत जाईल. या बहुतांश मेगासिटी विकसनशील देशांत असतील.
दिल्ली होणार लोकसंख्येची राजधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:25 AM