पोर्टलंड : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ जो बायडेन यांनी घेतली खरी परंतू त्यांच्या समोर मोठी आव्हाने आहेत. बायडेन यांनी शपथ घेताच काही तासांत आंदोलकांना गोंधळ घातला. तसेच बायडेन यांचा पक्ष डेमोक्रेटिकच्या मुख्यालयाची तोडफोड केली आहे. आंदोलकांनी पोलिसांविरोधात फॅसिस्टवादी नरसंहाराच्या घोषणा दिल्या.
आंदोलकांना बुधवारी (भारतीय गुरुवार) डेमोक्रेटिक पार्टीच्या स्थानिक मुख्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच इमारतीच्या काचा फोडल्या. सिएटलमध्ये काही जणांना अटकही करण्यात आली. आंदोलक बदल्याची भावना व्यक्त करत होते. यानंतर ते हिंसक झाले. पोर्टलँड पोलिसांनी सांगितले की, हिंसक झालेल्या आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हेगारी कृत्य, विध्वंसक उपकरणे बाळगणे आणि आग लावणे असे गुन्हे करण्यात आले आहेत.
डेमोक्रेटिक पार्टी ऑफ ओरेगनने जारी केलेल्या वक्तव्यानुसार पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाहीय. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या कार्यालयांची अशीच तोडफोड करण्यात आली आहे. मागे झालेल्या घटनांनंतरही आम्ही महत्वाचे काम केले आहे. अशा कोणत्याही घटना आम्हाला काम करण्यापासून रोखू शकत नाहीत.
पोलिसांनी केलेल्या हत्यांविरोधात 200 आंदोलकांनी पोलीस विरोधी नारेबाजी केली. तसेच पोर्टलंडच्या रस्त्यांवर उतरले. यावेळी त्यांच्या हाती We don't want Biden-We want Revenge, म्हणजेच आम्हाला बायडेन नकोयत, आम्हाला बदला हवाय, अशा घोषणा देत पोस्टर झळकावले. यावेळी आंदोलकांनी स्थानिक मुख्यालयाच्या खिडक्यांची तावदाने फोडली. तसेच ICE संपवावा, आम्हाला पोलीस नको आहेत, तुरुंगही नकोत, सीमा संपवा, राष्ट्राध्यक्ष नकोय, अशी घोषणाबाजी केली.
बायडेन यांनी शब्द पाळला...
कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या, कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला, अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच बायडेन यांनी कामालाही सुरूवात केली. तसंच बायडेन यांनी निवडणुकांपूर्वी दिलेला शब्दही पाळला.बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी घेतलेले काही निर्णय मागे घेतले. निवडणुकांदरम्यान बायडेन यांनी दिलेल्या आश्वासनांची आणि मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या अमेरिकेतील मागण्यांवर बायडेन यांनी स्वाक्षरी केली.