टोक्यो : भूत म्हटले की अंगावर शहारे येतात. भुताची भीती न वाटणारा माणूस विरळाच. आपल्याला भूत भेटते ते चित्रपट आणि पुस्तकातून. त्यामुळे ‘नो टेन्शन’; मात्र कोणाला खरोखरच भूत भेटले तर? नुसत्या कल्पनेनेच घाम फुटतो की नाही? जपानमध्ये एका ठिकाणी भुते रस्त्यावर फिरतात. एवढेच नाही तर ती टॅक्सीचालकांकडे लिफ्टही मागतात. लिफ्ट दिल्यानंतर चित्रविचित्र घटना घडू लागल्यानंतर टॅक्सीचालकाला आपण भुताला लिफ्ट दिल्याची जाणीव होते, अशा चर्चेमुळे खळबळ माजली आहे. २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीत जपानमध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. मेलेले हे लोक तोहोकू या ठिकाणी आजही दिसतात. ते टॅक्सीचालकांकडे लिफ्ट मागून विचित्र वागतात, असे या भागात टॅक्सी चालविलेल्या १० हून अधिक चालकांनी सांगितले. एका टॅक्सीचालकाने सांगितलेला किस्सा असा : मी टॅक्सी घेऊन जात असताना महिलेने लिफ्ट मागितली. लिफ्ट दिल्यानंतर काही वेळाने ती महिला अचानक टॅक्सीतून गायब झाली. दुसऱ्या चालकाला आलेला अनुभव वेगळा आहे. या चालकाने किरायाचे पैसे मागितल्यानंतर प्रवासी बेपत्ता झाला होता. अशा अनेक घटना तेथे रोजच होतात. कधीकधी लिफ्ट दिल्यानंतर टॅक्सी आपोआपच चुकीच्या दिशेला जाऊ लागते, असे काहींनी सांगितले. या भागात आजही चक्काचूर झालेल्या अनेक कार पडलेल्या आहेत. भुतांच्या भीतीमुळे टॅक्सीचालकांचय्या भागातील ये-जा आता कमी झाली आहे, असे सांगण्यात येते. अर्थात यावर विश्वास ठेवायला सरकार तयार नाही.
सुनसान रस्त्यावर भुते मागतात लिफ्ट?
By admin | Published: June 16, 2017 3:29 AM