न्यूयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी विजयी झाल्याचा आनंद अमेरिकेत साजरा होत असताना पूर्ण अमेरिकेत ‘डोनाल्ड ट्रम्प हे माझे अध्यक्ष नाहीत’, ‘फॅसिस्ट अध्यक्ष नको’ अशा घोषणा शेकडो हजारो निदर्शकांनी देत आपला राग व्यक्त केला. निदर्शकांनी जागरणे केली, रस्त्यात होळ््या पेटवल्या आणि रस्ते अडवले व घोषणाही दिल्या. न्यूयॉर्क, शिकागो, बोस्टन, फिलाल्डेफिया, कॅलिफोर्निया, कोलोराडो, सिएटल, लॉस एंजिलिस, अटलांटा, पोर्टलँड, आॅस्टीन, डेनव्हर, सॅन फ्रान्सिस्को व इतर शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या निदर्शनांत सगळ््या वयोगटाचे, धर्माचे आणि वेगवेगळ््या देशांचे नागरिकत्व असलेल्या निदर्शकांचा समावेश होता. सिएटल येथे ट्रम्प विजयी झाल्याच्या निषेधार्थ निदर्शने सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळच हा गोळीबार झाला. सिएटलच्या अग्निशमन विभागाने स्थानिक वेळेनुसार रात्री सात वाजता टिष्ट्वटरवर सांगितले की आमचे काही कर्मचारी गोळीबारात जखमी झालेल्या पाच जणांवर उपचार करीत आहेत. त्यातील दोघांच्या जखमांमुळे त्यांच्या जीविताला धोका आहे. हा गोळीबार निदर्शनांशी संबंधित आहे का हे लगेचच समजले नाही. गोळीबारानंतर संशयित फरार झाल्याचे स्थानिक किरो-टीव्हीने सांगितले. पोलिसांनी आम्ही गोळीबार व त्यात अनेक बळी गेल्याच्या घटनेचा तपास करीत असल्याचे बुधवारी रात्री सांगितले.महाभियोग चालवाबोस्टनमध्ये हजारो निदर्शकांनी ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा दिल्या. ‘ट्रम्प हे वंशवादी आहेत’ असे ते म्हणत होते. त्यांच्या हातात ‘ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा’ आणि ‘इलेक्टोरेल कॉलेज रद्द करा’ अशा मागण्यांचे फलक होते. चीनलाही बसला धक्काट्रम्प यांचा विजय जगात इतर देशांप्रमाणेच चीनसाठीही धक्कादायक होता. चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने संपादकीयात म्हटले की,‘‘बराच काळ बहुतेक लोकांना हिलरी क्लिंटन विजयी होतील व ट्रम्प यांची असुरक्षित वाटणारी प्रचार मोहीम कधीही बंद पडेल असेच वाटत होते. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीसाठी ना अमेरिका तयार आहे ना जग’’, असेही संपादकीय म्हणते. ट्रम्प यांच्यासारखा दिखाऊपणा करणारा व अहंकारी माणूस अध्यक्ष म्हणून निवडला जाऊ शकतो. यात काही तरी चुकले आहे, असेही त्यात म्हटले.जपान, द. कोरिया बनतील शक्तिशाली जपान आणि दक्षिण कोरिया हे खूप लवकर महत्वाचे शक्तिशाली देश बनू शकतील. ट्रम्प यांनी दक्षिण चीन समुद्रात (एससीएस) अमेरिकेच्या सैन्याची उपस्थिती असेल याचे आश्वासनही दिले आहे. अमेरिकेचा सत्तेचा फेरसमतोल हा कागदावरच राहणार याबद्दल गेल्या काही दिवसांत भारताने निराशाही व्यक्त केली होती. दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या लष्कराच्या उपस्थितीचे भारत आणि जपानकडून स्वागत होईल. यामुळे अशियन देशांना फिलिपाईन्सचे अनुकरण न करता पर्याय निवडता येऊ शकेल.ट्रम्प विजयाने भागीदारीचे भारतासोबत नवे पर्व येईल?नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दणदणीत विजयाने भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारीचे नवे पर्व सुरू होत आहे. उभय देशांतील भागीदारीतील नुकतेच अनुभवास येत असलेले अनिश्चिततेचे तत्व नाहीसे होऊ शकेल. परंतु ट्रम्प यांच्या परराष्ट्र नीतीच्या पहिल्या काही दिवसांत भारताला आपले म्हणणे पटवून देण्याची संधी मिळू शकेल. ट्रम्प यांचे अभिनंदन करणाऱ्या प्रारंभीच्या नेत्यांत नरेंद्र मोदी यांचा समावेश होता. त्यांनी अमेरिकेशी निकटचे संबंध निर्माण होतील, अशी आशा अभिनंदपर संदेशात व्यक्त केली होती. प्रचार मोहिमेमध्ये ट्रम्प यांनी भारताचा अनेक मार्गांनी उल्लेख केला होता. भारत हा वेगाने वाढणारा देश असून अमेरिकन लोकांचे रोजगार तो चोरतोय आणि दहशतवाद्यांनी भारताला लक्ष्य केले आहे, असे ते उल्लेख करीत होते. त्याआधी ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या उलटसुल विधानांमुळे आपल्या देशातील परराष्ट्रविषयक धोरणाचे अभ्यासकही गोंधळात आहेत. ट्रम्प हे जगाशी कसा व्यवहार करतील याकडे भारतात बारकाईने लक्ष असेल. चीन हा अमेरिकेसाठी सामरिकदृष्ट्या फार मोठे आव्हान असून ट्रम्प यांनी त्यावर खऱ्या अर्थाने भर दिलेला नाही. पण चीनला शह देण्यासाठी दक्षिण कोरिया आणि जपानला शस्त्रसज्ज व्हा, असे कळकळीने ट्रम्प यांनी सांगणे हे भारतासाठी खूप महत्वाचे आहे.
ट्रम्पविरोधात संपूर्ण अमेरिकेत निदर्शने
By admin | Published: November 11, 2016 4:45 AM