बीजिंग: साम्राज्य विस्तार करण्यासाठी सातत्यानं विविध देशांशी वाद उकरून काढणाऱ्या चीनची चिंता एका अहवालामुळे वाढली आहे. गेल्या काही दशकांपासून शस्त्रसज्जतेवर भर देणाऱ्या आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या चिनी सैन्याची चिंता वाढवणारा अहवाल अमेरिकेच्या एका मासिकानं प्रसिद्ध केला आहे. चिनी सैन्य जास्त उंचीवर असलेल्या भागांमध्ये युद्ध लढू शकत नाही, अशा आशयाचा अहवाल नॅशनल इंटरेस्ट नावाच्या अमेरिकन मासिकानं प्रसिद्ध केला आहे.
चीनकडे अत्याधुनिक हत्यारं आहेत. मात्र उंचीवर असलेल्या भागांमध्ये युद्ध पेटल्यास शस्त्रास्त्रं पोहोचवण्याची यंत्रणा चीनकडे नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यास चिनी सैन्य लढू शकणार नाही, असं अहवाल सांगतो. चिनी सैन्यानं काही दिवसांपूर्वीच पश्चिमेकडील भागात रॉकेट आणि शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली. यामध्ये PHL-11 मल्टी रॉकेट लॉन्चर, PHL-03 लाँग रेंज रॉकेट लॉन्चर आणि PCL हॉवित्झर तोफांचा समावेश होता. ...म्हणे मोदींनी मला पैसे पाठवलेत! खात्यात चुकून आलेले ५.५ लाख देण्यास ग्राहकाचा नकार
चीनकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आहेत. मात्र ही शस्त्रास्त्रं लादून नेण्यासाठी आवश्यक असलेली हेलिकॉप्टर्स चिनी सैन्याकडे नाहीत. शस्त्रास्त्रं डोंगराळ भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी चिनूकसारख्या हेलिकॉप्टर्सची गरज असते. या हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून रॉकेट लॉन्चर आणि शस्त्रास्त्रं उंचावर असलेल्या भागांमध्ये सहज नेता येतात.
चीनकडे z-8 कार्गो हेलिकॉप्टर आहेत. मात्र चिनूकची तुलना केल्यास त्यांची क्षमता निम्मीदेखील नाही. चिनी हेलिकॉप्टर २० हजार पाऊंड्सपर्यंतचा भार उचलू शकतात. तर चिनूकची क्षमता ५० हजार पाऊंड्सची आहे. त्यामुळे शस्त्रास्त्रांची ने-आण करणं चिनी सैन्यासाठी आव्हानात्मक आणि जिकरीचं आहे.