अमेरिकेतील इलिनॉईसमधील क्विन्सी येथे सध्या जुळ््या बहिणी खूप चर्चेत आहेत. जुळी मुले रंगात, शरीर प्रकृती आदी गोष्टींत खूप सारखेपणा असल्याचे दिसते, परंतु चर्चेत असलेल्या या बहिणींत काहीच सारखेपणा नाही. अर्थात, त्यामागे कारणही आहे.या बहिणींची नावे कलानी आणि जरानी डीन आहेत. त्या जुळ््या असल्या तरी त्यांचा रंग पाहून त्यावर विश्वास बसत नाही. त्यांची आई व्हिटनी मेयर आणि वडील टॉमस डीन आहेत. कलानी डीन आणि जरानी डीन यांचा जन्म २३ एप्रिल, २०१६ रोजी झाला.त्यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचा रंग आणि नाक, डोळे, डोके यात बराच फरक लक्षात आला. कलानी तिच्या आईवर गेली आहे. तिचा रंग खूप उजळ असून डोळे निळे आहेत. जरानी वडिलांवर गेली आहे व तिच्या त्वचेचा रंग तेवढा उजळ नाही. तिचे डोळेदेखील वडिलांच्या डोळ््यांसारखे भुरे आहेत.या दोघींच्या पालकांनी त्यांचा वाढदिवस नुकताच साजरा केला व त्याची छायाचित्रेही पोस्ट केली. ज्यांनी ती बघितली त्यांना धक्काच बसला. या मुलींचा रंग आणि शरिराची ठेवण वेगळी असल्यामुळे विज्ञानात त्याला बिरेशिएल टिष्ट्वन्स म्हणतात. म्हटले जाते की अशी जुळी जवळपास ५०० जुळ््यांत जन्माला येतात.बिरेशिएल टिष्ट्वन्स मुलांचा जन्म जेव्हा दोन वेगवेगळे शुक्राणू दोन वेगवेगळ््या अंडाणुंना निषेचित करतात त्यावेळी होतो. याशिवाय त्यांचे डोळे, रंग आदी वैशिष्ट्ये यासाठी जीन जबाबदार असतात.पालकांच्या वेगवेगळ््या जीन्सचा प्रभाव यात स्पष्टपणे दिसतो.या मुलींमध्ये त्यांच्या आई व वडिलांच्या वेगवेगळ््या जीन्समुळे अंतर दिसत आहे. आकर्षक दिसणारी कलानी आणि जरानी यांच्याबद्दल त्यांच्या पालकांचे म्हणणे असे आहे की या मुली वंशवादाविरोधात एक प्रतिक आहेत.
जुळ्या असूनही बहिणी सारख्या दिसत नाहीत
By admin | Published: July 12, 2017 12:25 AM