केवळ "भूकंप", या नावानेही लोकांच्या मनात धडकी भरते. नुकतेच दिल्ली आणि नेपाळला भूकंपाचे धक्के जाणवले. यात कसल्याही प्रकारची जीवित वा वित्त हाणी झाली नसली तरी लोकांध्ये भीती मात्र पसली. यातच, आता पाकिस्तानात लवकरच एक विनाशकारी भूकंप येणार असल्याची चर्चाही लोकांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात एका डच वैज्ञानिकाने भविष्यवाणीही केली आहे. याच वैज्ञानिकाने या वर्षाच्या सुरुवातीला तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपा येईल, अशी भविष्यवाणीही केली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, नेदरलँड्समधील एका रिसर्च इंस्टिट्यूटने येणाऱ्या काही दिवसांत पाकिस्तानात भूकंप येऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. यासंदर्भात, सोलार सिस्टिम जॉमेट्री सर्व्हेच्या (एसएसजीईओएस) रिसर्चरने म्हटले आहे की, पाकिस्तान आणि जवळपासच्या भागात मोठे वातावरणीय चढ-उतार दिसून आले आहेत. जो येणाऱ्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांचा संकेत देऊ शकतो. नेदरलँड्समधील भूकंप वैज्ञानिक फ्रँक हूगरबीट्स याच इंस्टिट्यूटमध्ये आहेत. त्यांनी भविष्यवाणी केली आहे की, पाकिस्तान आणि त्याच्या जवळपासच्या भागांत भूकंपाचे जोरधार धक्के बसू शकतात.
फ्रँक हूगरबीट्स यांनीच तुर्कि आणि सीरियामध्ये घातक भूकंपाची भविष्यवाणी करण्यासाठी गणितीय उपकरणांचा वापर केला होता. त्यांनी म्हटले आहे की, येणाऱ्या काळात तीव्र भूकंपाचे धक्के बसतील अशी शक्यता आहे. मात्र, असे केव्हा होईल हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. महत्वाचे म्हणजे, या भविष्यवाणीच्या काही दिवसांतच भारत आणि नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.2 एवढी मोजण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या हवामान विभागाने दावा फेटाळला -पाकिस्तान हवामान विभागाने फ्रँक हूगरबीट्स यांचा दावा फेटाळला आहे. कुठल्याही भूकंपाची अचूक भविष्यवाणी करणे अशक्य असल्याचे या विभागाने म्हटले आहे.