शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

जपानमध्ये पोहोचताच देवेंद्र फडणवीस यांचं मराठमोळं स्वागत; स्टेट गेस्ट म्हणून विशेष मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:43 AM

Devendra Fadnavis Japan Tour: जपान दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Devendra Fadnavis Japan Tour:जपान सरकारकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'स्टेट गेस्ट' म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीसजपान दौऱ्यावर पोहोचले आहेत. जपान येथे पोहोचताच देवेंद्र फडणवीस यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस हे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रप्रमुख किंवा त्याच्या समकक्षीय नेत्यालाच स्टेट गेस्ट म्हणून जपानचे सरकार आमंत्रण देते. २०१३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जपानने स्टेट गेस्ट म्हणून बोलविले होते. यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा झाली होती. देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यावेळी जपानच्या शाही महालात स्नेह भोजनाचे ही आयोजन केले जाणार आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले

जपान दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी विमानतळावर उतरल्याबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले. जपानमध्ये स्थित भारतीयांनी विमानतळावर माझे जंगी स्वागत केले. ज्याप्रमाणे माझे कुटुंबीय माझे औक्षण करतात अगदी तसेच स्वागत माझे जपानमध्ये झाले. भारतीयांनी गायलेले 'लाभले आम्हास भाग्य' या गीताने जपान अगदी महाराष्ट्रमय झाल्यासारखे वाटले. खरंच जपानमध्ये आल्यानंतर आपली संस्कृती आणि महाराष्ट्रावरचे प्रेम, आपले भारतीय किंचितही विसरले नाहीत. त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे. खूप खूप धन्यवाद जपान या आतिथ्य आणि प्रेमासाठी!, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचा एक गट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जपान दौऱ्यावर असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. सुनिटोमो, एनटीटी आणि सोनीसारख्या कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच विरार सी लिंक, ठाणे कोस्टल रोड आणि नागपुर-गोवा एक्सप्रेस वे या प्रकल्पांसाठी जपानकडून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या 'जेआसीए'च्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. जपान- इंडिया असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJapanजपान