शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
4
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
5
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
6
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
7
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
8
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
9
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
10
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
11
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
12
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
13
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
14
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
15
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
16
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
17
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
20
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं

हुकूमशहा किम जोंग उन यांची मुलगी करणार उत्तर कोरियावर राज्य; दक्षिण कोरियाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:50 IST

नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकपणे दिसली होती

Kim Jong Un daughter Kim Ju ae: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची धाकटी मुलगी त्यांची उत्तराधिकारी असू शकते अशी शक्यता दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने व्यक्त केली आहे. विशेषत: गेल्या वर्षभरात ज्या प्रकारे त्यांची सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती वाढली आहे, त्यामुळे या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. किम जोंगची धाकटी मुलगी, किम जू ए, ही सध्या केवळ १० वर्षांची आहे. ती नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकपणे दिसली होती जेव्हा तिने तिच्या वडिलांसोबत लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र चाचणी पाहिली होती. तेव्हापासून, झू ए तिच्या वडिलांसोबत सतत सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहे. कोरियन मीडिया सतत तिला किमचे सर्वात लाडके अपत्य म्हणत आहेत. कोरियन मीडियामध्ये तिची वाढती राजकीय प्रतिष्ठा आणि तिच्या वडिलांशी असलेली जवळीक सातत्याने हे सिद्ध करत आहे. तसे अनेक फोटो आणि व्हिडीओ फुटेजही दिसत आहेत.

किम जोंगची धाकटी मुलगी किम जू ए तिच्या वडिलांच्या जवळ आहे, हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेकदा दिसून येते. सप्टेंबरमध्येच लष्करी परेडच्या वेळी व्हीआयपी स्टँडमध्ये ती सैन्याला प्रोत्साहन देत, टाळ्या वाजवताना दिसली. सैन्यातील एक जनरल गुडघ्यावर बसून तिच्या कानात काहीतरी कुजबुजतानाही दिसला. नोव्हेंबरमध्ये झू ए हिने वडिलांसोबत हवाई दलाच्या मुख्यालयालाही भेट दिली होती.

किम जोंग उन उत्तराधिकाऱ्याच्या शोधात

दक्षिण कोरियाची मुख्य गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजेंस सर्व्हिसने गुरुवारी सांगितले की किम जू ए तिच्या वडिलांची संभाव्य उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आहे. तिच्या सार्वजनिक उपक्रमांमुळे आणि तिला प्रदान केलेल्या प्रोटोकॉलमुळे ही शक्यता वाढली आहे. एनआयएस सार्वजनिक व्यवहार कार्यालयाने एपी वृत्तसंस्थेला सांगितले की, उत्तर कोरियाचा हुकूमशहा उत्तराधिकार प्रक्रियेसंदर्भात सर्व पर्यायांचा विचार करत आहे, जेणेकरुन वेळ आल्यावर त्यांना कोणताही त्रास होणार नाही.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरियाKim Jong Unकिम जोंग उन